पुणे: वारजेत विजेच्या वाढीव बिलांमुले नागरिक त्रस्त

Electricity

वारजे – वारजे परिसरात नागरिकांना महावितरणकडून देण्यात येणारी वाढीव बीले व वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा यामुळे वारजे विकास कृती समितीच्या वतीने महावितरणच्या विरोधात आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे. वारजे परिसरातील मिटरधारकांना वाढीव लाईट बीले देण्यात येत असून त्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या संदर्भात महावितरणकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. याविषयी महावितरणाने येत्या आठ दिवसात योग्य तो निर्णय नाही घेतल्यास 2 जुलेै रोजी सकाळी 10 वाजता डहाणूकर कॉलनी येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. तसे निवेदन डहाणूकर कॉलनी येथील महावितरणचे अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. या संदर्भात नगसेवक दिलीप बराटे यांनी सांगितले की, महावितरणच्या चूकीच्या कार्यपद्धत्तीचा फटका नागरिकांना बसत आहे. येणाऱ्या वाढीव बिलांमुळे नागरिक हैराण झाले असून महावितरणला जाग आणण्यासाठी याविरोधात आता आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)