पुणे : वसुलीच्या कारणाने ‘बत्ती गूल’ होण्याचे प्रमाण वाढले

संग्रहित छायाचित्र

पुणे- आर्थिक वर्ष संपण्यास अवघा काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने महावितरण प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. मात्र, अन्य कामे आणि त्यातच अपुरे मनुषबळ याचा समन्वय साधताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कंत्राटी कामगारांचीही संख्या कमी केल्याने हा ताण आणखी वाढतच चालला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महसूल वसुलीच्या कामामुळे वीजयंत्रणेची देखभाल होत नसल्याने बत्ती गुल होण्याच्या प्रमाणात ऐन उन्हाळयाच्या काळात वाढ झाली आहे. वसुलीवर लक्ष देताना वीजयंत्रणेची देखभाल करण्याचे आणि वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्याच्या सूचना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असा दावा महावितरणचे मुख्य अभियंता मल्लेशा शिंदे यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)