पुणे – वर्दळीच्या रस्त्यांवर आता “व्हर्टिकल’ पथारी

अतिक्रमण विभागाकडून चाचपणी सुरू

पुणे – वर्दळीच्या रस्त्यांवर ज्या ठिकाणी पथारी व्यावासायिकांना जागा देण्यात आली आहे, त्यांच्या पथारीच्या आकाराबाबत “व्हर्टिकल स्टॉल’ ही अभिनव संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी पथारीचे “डिझाइन’ तयार करणे अतिक्रमण विभागाने सुरू केले असून संघटनांशी चर्चा करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून शहरात शहर फेरीवाला धोरण 2014 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत पथारी व्यावसायिकांची बायमोमेट्रिक नोंदणी करून त्यांना देण्यात आले आहेत. तर, व्यवसायाच्या जागेनुसार त्यांच्या “अ’ ते “क’ श्रेणी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने “अ प्लस प्लस’ श्रेणीत तुळशीबागेसह, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आहे. या ठिकाणी महापालिकेने नव्याने उभारलेल्या पदपथांवरच या पथारी व्यावसायिकांना बसण्यास जागा देण्यात आली असून त्यांना 3 बाय 5 फूट रूंद जागेत व्यावसाय करण्यास परवानगी आहे. मात्र, अनेकदा हे व्यावसायिक आपले साहित्य पदपथ अथवा रस्त्यावर विस्तारतात. त्यामुळे पादचारी तसेच वाहनांनाही अडथळा निर्माण होतो. त्यातून अनेकदा तक्रारी आल्यानंतर व्यावसायिकांना अधिकृत दर्जा दिल्यानंतरही त्यांचे साहित्य जप्त करून दंडाची आकारणी केली जाते. त्यामुळे अनेकदा वादाची स्थिती निर्माण होते.

ही बाब लक्षात घेऊन यावर समन्वयाने तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने व्हर्टिकल स्टॉलची संकल्पना राबविण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. त्या अंतर्गत पथारी पदपथावर विस्तारून मांडता मांडणीच्या स्वरूपातील “स्ट्रक्‍चर’ तयार करून त्यावर साहित्य मांडावे. म्हणजे पदपथ रिकामे राहतील, तसेच आलेल्या ग्राहकांनाही हे साहित्य सहज पहाता येईल. परिणामी, पदपथ तसेच रस्त्यास अडथळा निर्माण न होता. विक्रेते तसेच पादचाऱ्यांनाही त्रास होणार नसयल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

पदपथ मोकळा करण्याचा प्रयत्न
हे “व्हर्टिकल स्टॉल’ कशा प्रकारचे असावेत, यासाठी “डिझाइन’ तयार करणे पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. हे “डिझाइन’ करून पथारी धारक आणि व्यावसायिक संघटनांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात अशा प्रकारचे स्टॉल करून साहित्य विक्रीस ठेवावे. तसेच जास्तीत जास्त पदपथ नागरिकांसाठी मोकळा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना केल्या जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)