पुणे-लोणावळ्यादरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार

पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-लोणावळ्यादरम्यान येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. या मार्गावरील दापोडी, पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि वडगाव याठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले असून यासाठी 14 कोटी 50 लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे-लोणावळ्यादरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. या मार्गावरील प्रवाशांना अपुऱ्या प्लॅटफॉर्ममुळे चढ-उतार करण्यास अडचण येत असून अपघात होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. यामुळे मार्गावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, वडगाव आणि मळवली या स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरुन 15 डब्यांची लोकल चालवता येणार आहे. तसेच, शिवाजीनगर येथील कामाला अतिक्रमणामुळे अडथळा येत अतिक्रमण हटवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)