पुणे-लोणावळा लोकल सेवेसाठी ‘मोबाईल तिकीट’

पुणे – रेल्वेचे व्यवहार जास्तीत जास्त पेपरलेस करण्याच्यादृष्टीने पुणे रेल्वे प्रशासनाने पुणे-लोणावळा लोकलची तिकिटे मोबाईलवर ऑनलाईन मिळण्याची सुविधा सुरू केली आहे. स्मार्ट फोन वापरणाऱ्या प्रवाशांना मोबाईलवर ही तिकिटे उपलब्ध होऊ शकणार आहेत. या सेवेचा फायदा जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन पुणे रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरीय लोकल सेवेच्या धर्तीवर ही सेवा पुणे ते लोणावळा दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे स्टेशनवर सुरू करण्यात आली आहे. पुणे-लोणावळा दरम्यान दररोज एक लाख 12 हजार प्रवासी प्रवास करत असतात. त्यातून 13 लाख 10 हजार रुपयाचे उत्पन्न दररोज मिळते. दररोज साधारण एक लाख तिकिटे दिली जातात. कागदाचा खर्च काही प्रमाणात वाचवा या हेतूने पुणे उपनगरीय लोकल सेवेचे तिकिटे मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
लोकलचे तिकिट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

तिकीट काढण्यासाठी असणाऱ्या लांब रांगेमुळे अनेकवेळा लोकल निघून जाण्याचे प्रकार घडतात.त्यामुळे ही रांग वाचणार आहे. त्यासाठी मोबाईल धारकांना एक ऍप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. “युटीएस ऍप’ असे त्याचे नाव आहे. गुगल प्ले स्टोअर, ऍपल प्ले स्टोअर आणि विन्डो प्ले स्टोअरवर हे ऍप उपलब्ध असणार आहे. या स्टोअरवरून हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर आपला मोबाईल नंबर व आपली माहिती रजिस्टर करायची आहे. त्यानंतर एसएमएसमार्फत एक नंबर आपल्याला दिला जाईल. हा आपला लॉग इन आयडी व पासवर्ड असणार आहे.

हा पासवर्ड तिकीट नोंदणी करताना प्रत्येकवेळी प्रवाशाला भरावा लागणार आहे. अशा तऱ्हेने उपनगरीय रेल्वे गाडीचे तिकीट तत्काळ उपलब्ध होणार आहे. हे तिकिट इमेज स्वरुपात असणार आहे. त्यामुळे तिकीट चेकरला ही इ-मेज दाखविल्यास हे तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तिकीट रद्द होवू शकणार नाही, अशी माहिती रेल्वे पुणे विभागाचे महाप्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)