पुणे-लोणावळा लोकल धावणार सुपरफास्ट

चाचणी यशस्वी : आता ताशी 100 कि.मी.चा वेग

पुणे  – गेले अनेक वर्षांपासून प्रति तास 80 कि.मी. वेगाने धावणाऱ्या पुणे-लोणावळा लोकलने आता स्पीड पकडला आहे.नुकत्याच घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये प्रति तास 100 पेक्षाही अधिक वेग पकडण्यात या लोकल यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जलद आणि वेळेवर सुविधा मिळणार आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी पत्रकारांना नुकतीच माहिती दिली. ते म्हणाले, “मध्य रेल्वेने मागील वर्षभरात केलेल्या विविध दुरुस्ती आणि कामांमुळेच हे शक्‍य झाले आहे. पुणे-लोणावळादरम्यानचा रेल्वे मार्ग हा सर्वांत व्यस्त आहे. या मार्गावरुन रोज 124 हून अधिक एक्‍सप्रेस व पॅसेजर रेल्वे धावतात. शिवाय साधारण 44 फेऱ्या या लोकल सेवेच्या होतात. त्यामुळे वेळेचे नियोजन हे कठीण होते.

सर्वप्रथम आम्ही पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणा बदलली. पूर्वी मॅन्यूअल असणारी यंत्रणा ऑटोमेटिक केली. त्यामुळे गाड्यांना सिग्नल तातडीने मिळू लागले. लोणावळा ते देहुरोडदरम्यान प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर हे स्वंयचलित सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणे-लोणावळा लोकलला वर्षानुवर्षे जुनेच रेक होते. ते बदलून नवीन सिमेन्सचे रेक बसविले. हे रेक तातडीने वेग पकडतात. त्यामुळे लोकल अगदी काही सेकंदात जास्त वेग पकडू शकते. यामुळे आता लोकल रेल्वे ताशी 100 कि.मी.पेक्षा अधिक वेगाने धावत आहेत. शिवाय रेल्वे गाड्याचे वेळापत्रक ही नियमित ठेवण्यात यश आले आहे.’

सिग्नल व्यवस्था आणि इतर सुधारणामुळे आता रोज पुणे-लोणावळा मार्गावरुन 140 एक्‍स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वे धावू शकतील. याशिवाय पुणे-दौंड मार्गावर प्रत्येक दोन स्टेशनच्या मध्ये ब्लॉक सिग्नल यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे यामार्गावर जास्तीत जास्त रेल्वे धावू शकतील. यापुढील काळात रेल्वे स्थानकांची सुधारणा करण्यात येणार आहे. रेल्वे प्लॅटफार्म अधिक सोयींयुक्त करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
– मिलिंद देऊस्कर, मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)