पुणे-लोणावळा लोकल आणखी धावणार सुपरफास्ट

चौथी रेक दाखल : लवकरच घेण्यात येणार चाचणी

पुणे, दि. 20- पुणे-लोणावळा लोकलचा वेग वाढविण्यासाठी आवश्‍यक असणारे सिमेन्सचे रेक आता पुणे रेल्वे प्रशासनाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. यापूर्वी तीन रेक दाखल झाले होते. चौथा रेकही रविवारी दाखल झाल्याने आता पुणे-लोणावळा लोकल प्रवाशांना आणखी सुविधा मिळणार आहे.

यापूर्वीचे रेक हे जीर्ण झालेले असल्याने ते काढण्यात आले आहेत. जुन्या रेकच्या लोकल या ताशी 80 किमी वेगाने धावत होत्या. आता हे सिमेन्सचे रेक हे मजबूत असल्याने लोकलचा वेग हा ताशी 100 किमी पर्यंत नेणे शक्‍य होणार आहे. सध्या पुणे-लोणावळा अंतर हे जुन्या लोकल मधून साधारणात: दीड तासात कापले जाते. पण आता या नवीन रेकमुळे वेग वाढेल हे अंतर 55 मिनिटांमध्ये पार करणे सोपे होणार आहे. याची लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे.

ब्रेक लावल्यानंतर सिमेन्सच्या रेकमध्ये उर्जानिमिती करण्याची क्षमता आहे. यामुळे 20 ते 30 टक्के विजेची बचत होते. या मार्गावर आता लोकलचे चार रेक उपलब्ध झाले आहेत. तर दिवसभरात लोकलच्या 44 फेऱ्या होतात. लोणावळा-तळेगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलचे काम पूर्ण झाल्यानेही लोकलचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

हे सिमेन्सचे रेकची अंतर्गत सजावट आर्कषक आहे. त्याचबरोबर हवा खेळती राहवी म्हणून याच्या खिडक्‍याही मोठ्या आहेत. उभे राहून प्रवास करणाऱ्यांसाठी जादा हॅंडेल बार देण्यात आले आहेत.

जुन्या रेकमुळे पुन्हा नाराजी
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई येथून सिमेन्सचा रेक पुणे यार्डात दाखल झाला होता. त्यावेळी नवीन रेक असेल, असे प्रवाशांना वाटले होते. पण, हा रेक मुंबईत वापरल्याचे लक्षात आले. त्यानंतर पुन्हा आलेले तीन नवीन रेकसुद्धा मुंबई लोकलमध्ये वापरलेले आहेत. त्यामुळे जुनेच रेक पुण्याला पाठवल्याची नाराजी पुणे-लोणावळा प्रवाशांमध्ये आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)