पुणे-लोणावळा दरम्यान वीस दिवस ब्लॉक

10 ते 30 सप्टेंबरदरम्यान दररोज तीन तास होणार विविध तांत्रिक कामे

पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता ब्लॉक घेण्यात येणार आहे. 10 ते 30 सप्टेंबरदरम्यान दररोज तीन तास हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

या कालावधीमध्ये इंजिनिअरिंग, सिग्नल व ओएचई विभागाद्वारे विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून लोणावळाकरिता दुपारी 12.15 आणि 1 वाजता सुटणारी लोकल त्याचबरोबर लोणावळ्याहून पुण्याला दुपारी 2 वाजता आणि 3.40 ला सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी रद्द करण्यात आलेली बारामती-पुणे पॅसेंजर 9 तारखेपासून वेळेवर सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनी या सर्व बदलांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्लॉक घेणे रेल्वेसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या काळात घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. पुणे रेल्वेने मुंबईसारखे जास्तीचे माणसे कामाला लावून कामे लवकर करून घेणे गरजेचे आहे. यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवार ब्लॉक घेऊन काम करावे.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)