पुणे – लोणावळा-कर्जत दरम्यान रेल्वेचे विशेष पथक

पुणे – पावसाळ्यामध्ये रेल्वेला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच घाट मार्ग असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवावे लागते. या पार्श्‍वभूमिवर मध्य रेल्वेच्यावतीने लोणावळा ते कर्जत या घाट मार्गाच्या पाहणीसाठी विशेष टीम नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 32 गॅगमनची ही टीम पूर्ण पावसाळ्यात घाटमार्गावरील देखरेख करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोणावळा ते कर्जत या 29 किलोमिटच्या घाट क्षेत्रात गॅगमनकडून लक्ष ठेवले जाणार आहे. हा मार्ग डोंगरी भाग आहे. यामुळे अनेकदा रेल्वे रुळावर दरड कोसळण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो, तसेच रुळाचेदेखील नुकसान होते. या पार्श्‍वभूमिवर प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. मागील वर्षी रेल्वेने ड्रोनद्वारे लोणावळा घाटाचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये घाटातील दरड प्रवण क्षेत्रे निश्‍चित करण्यात आली होती. त्याच्या आधारेच 32 ट्रॅक मेंन्टेनन्स एक्‍स्पर्टस्‌ची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत याठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते कर्जत घाट मार्गात साधारणपणे 370 कर्मचारी कार्यरत असतात. या व्यतिरिक्त आता 32 गॅंगमन कार्यरत असतील. हे गॅंगमन शिफ्टमध्ये 24 तास उपलब्ध असणार असून, सातत्याने मार्गाची पाहणी करणार आहेत. तसेच, कोठे अडथळा असल्यास तातडीने दुरुस्त करतील.
लोणावळा ते कर्जत या दरम्यानच्या अप आणि डाऊन लाईन जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अप किंवा डाऊन लाईनवर काही अडथळा निर्माण झाल्यास वाहतूक थांबणार नाही. दोन्ही मार्ग जोडण्यासाठी टाकलेल्या रुळांवरून रेल्वे गाड्या मार्गस्थ होऊ शकतात असे सांगण्यात आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)