पुणे: लोखंडी गजाने मारहाण; तिघांना पोलीस कोठडी

पुणे – जेवनाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने हॉटेल मालक आणि त्यांच्या वडिलांना लोखंडी गजाने मारहाण करणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दीपक रामहरी खुणे (वय 28), गौरव गजानन आगरवाल (वय 20), सुमीत संजय वाकडे (वय 25, तिघेही रा. चंदननगर) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महेश मारुती देवकर (वय 19, खराडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे खराडी बायपास येथे शिवशंभो हॉटेल आहे. यामध्ये आरोपी जेवणासाठी आले होते. यावेळी फिर्यादींनी जेवणाचे पैसे मागीतल्याचा राग आल्याने आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच, काय झाले हे पाहण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या वडीलांना देखील लोखंडी गजाने मारहाण केली. यात देवकर यांचे वडील हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून आरोपींनी गुन्हा करताना परिधान केलेले कपडे हस्तगत करायचे आहेत. सदरचा गुन्हा का केला याचा उद्देश जाणून घेऊन तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)