पुणे – लोकसभेसाठी प्रदेश कॉंग्रेसकडून दोन उमेदवारांची नावे

पुणे – दीर्घ काळापासून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस पक्षाला चेहराच नाही, असे चित्र दिसत असतानाच प्रदेश कॉंग्रेसने पुणे मतदार संघासाठी माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड या तीन नावांची शिफारस केल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आता हे निश्‍चित झाले आहे. 48 पैकी बहुतांशी मतदार संघांची वाटणीसुद्धा झाली आहे. त्यातील कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या मतदार संघांमध्ये कॉंग्रेसच्या केंद्रीय समितीने इच्छुकांची नावे पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रदेश कॉंग्रेसने केलेल्या पाहणीमध्ये पुणे लोकसभा मतदार संघातून सुरूवातीला चार ते पाच जणांची नावे होती. त्यात मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड यांच्यासह अनंत गाडगीळ, अरविंद शिंदे, उल्हास पवार यांच्या नावांचा समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्याची जागा राष्ट्रवादी नाही, तर कॉंग्रेसच लढविणार असल्याचे ही या तयारीतून दिसून येत आहे. जोशी यांनी या आधी 1999 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. तसेच विधान परिषदेचेही सहा वर्षांसाठी सदस्य होते. अभय छाजेड हे पालिकेच्या राजकारणातील पारंगत नेते असून अनेक वर्षे त्यांनी शहर कॉंग्रेसची धुरा संभाळली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. पुण्यातून कॉंग्रेस बाहेरचा उमेदवार देतील असे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे गुणवत्तेनुसार तिकिट आपल्याला मिळाले पाहिजे असेच दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)