पुणे : लूटमारीच्या दोन घटनांत सत्तर हजार लांबविले

पुणे- दोन वेगवेगळ्या भागांत घडलेल्या लुटमारीत जवळपास 70 हजार रुपये लुटून नेल्याचा प्रकार समोर आला. विमानतळ व स्वारगेट परिसरात या घटना घडल्या. चोरट्यांनी हातचालखी करुन हे पैसे लांबविले.

लोहगावात तरुणाला लुटले
शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोहगाव फॉरेस्ट पार्कसमोरुन जाताना मयुर गुरव (26, रा. हडपसर) या दुचाकीस्वाराला अडवून लुटण्यात आले. ते फॉरेस्ट पार्कसमोरुन जाताना चार व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. यानंतर त्यातील एकाने बॅगेत काय आहे असे विचारत त्यातील 4 हजार 200 रोख आणि सोनसाखळी असा एकूण 59 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव करत आहेत.

टिळक रस्त्यावरही गंडा
लुटमारीची दुसरी घटना ही शनिवारी सायंकाळी टिळक रस्त्यावरील स्टेट बॅंकेच्या एटीएमसमोर घडली. प्रदीप लासुरे (35, रा. वारजे) हे एटीएमसमोर त्यांच्याजवळील रक्कम मोजत होते. यावेळी अनोळखी व्यक्तीने जवळ येत मी तुम्हाला नोटा तपासून देतो असे सांगत 12 हजार रुपये लांबवले. लासुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)