पुणे – लाच स्विकारताना महिला अधिक्षकासह लिपीक जाळ्यात

पुणे – आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अनुदान बिल मंजूर करण्यासाठी शिक्षण विभागातील महिला कार्यालय अधिक्षक यांनी शैक्षणिक संस्थाचालकाकडे दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यातील 50 हजार रुपये स्विकारतांना महिला अधिकाऱ्यासह लिपीकाला एसीबीने रंगेहात पकडले. हि कारवाई सांगवीतील नॅशनल इंग्लिश स्कूलच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजता करण्यात आली.

कार्यालय अधीक्षक शिल्पा सुरेश मेनन (45, पर्वती), लिपीक महादेव मच्छिंद्र सारूख, (47, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे रंगेहात पकडेल्याला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी 58 वर्षीय संस्थाचालकाने एसीबीकडे तक्रार दिली होती.

मेनन या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यालय अधिक्षक आहेत; तर महादेव सारूख हे त्याच विभागात लिपीक आहेत. यासंबंधी तक्रारदार हे संस्थाचालक असून त्यांची सांगवी येथे शाळा आहे. या शाळेत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुदान मिळते. शासनाकडून मिळणारे हे अनुदानाचे बिल मंजूर करून रक्कम देण्यासाठी मेनन यांनी संस्थाचालकाकडे दीड लाख रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे लाच मागणाऱ्यांची तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास तक्ररादार यांच्या शाळेत लाचेचा पहिला हप्ता स्विकारण्यासाठी संबंधित कर्मचारी आले होते. लाचेचा पहिला हप्ता हा 50 हजारांचा होता. मात्र, लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने सापळा रचून लाच स्विकारणाऱ्या कर्मचाराऱ्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)