पुणे : लाचखोर सहायक निबंधक जाळ्यात

पुणे – सोसायटी नोंदणीचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या साखर संकुल कार्यालयातील सहायक निबंधकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सतीश अबुराव ठमाळ (51, रा. कात्रज-कोंढवा रोड) असे लाच स्विकारणाऱ्या लोकसेवकाचे नाव आहे.

ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेचार वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी एका इसमाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार राहात असलेल्या सोसायटीच्या नोंदणीचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी सहायक निबंधक सतीश ठमाळ यांनी 10 हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदार यांनी यासंबंधीची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यानुसार सापळा रचून ठमाळ याला रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळून 10 हजार रुपये जप्त करण्यात आले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)