पुणे – लाचखोर जीएसटी सहायक आयुक्ताला अटक

– तीस हजारांची लाच घेताना अडकला सापळ्यात

पुणे – असेसमेंटची (मूल्यांकन) ऑर्डर विरोधात न जाण्यासाठी येरवड्यातील वस्तू व सेवा कर विभागातील सहायक आयुक्‍ताने एकाकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांनी सहायक आयुक्‍ताला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास जीएसटी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये करण्यात आली.

प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय-48, रा. B/2, फ्लॅट नंबर 204, प्रसादनगर, वडगाव शेरी) असे अटक सहायक आयुक्ताचे नाव आहे. याप्रकरणी एका ज्येष्ठ व्यक्तीने तक्रार दिली होती.
याबाबत सविस्तर असे, तक्रारदार हे कॉंट्रॅक्‍टर आहेत. त्यांनी 2013 मध्ये केलेल्या सिव्हिल वर्कच्या कामाच्या वेळी 5 टक्के व्हॅट होता. त्यानुसार तक्रारदार यांनी तो भरला होता. परंतु, प्रसाद पाटील यांनी तक्रारदाराला “कमी टॅक्‍स भरला’ असे सांगितले. तो टॅक्‍स 8 टक्‍क्‍यांप्रमाणे भरायचा असून त्याप्रमाणे तक्रारदार यांना असेसमेंटची ऑर्डर त्यांच्याविरुद्ध अपिलमध्ये न जाण्यासाठी त्यांच्याकडून 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी याची माहिती लालचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार बुधवारी दुपारी 12.45 वाजता जीएसटी कार्यालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये सापळा रचून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रसाद पाटील याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)