पुणे: लहान मिळकतींना कर सवलत स्थायीनेही नाकारली

प्रशासनाचा अभिप्राय मंजूर : आर्थिक अडचणीचे कारण

पुणे- मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिका हद्दीतील 700 चौरस मीटर पेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना मालमत्ता कर माफ करण्यास महापालिका प्रशासनाने स्पष्ट शब्दांत नकार देत त्याबाबतचा अभिप्राय स्थायी समिती समोर सादर केला होता. हा अभिप्राय मान्य करत स्थायी समितीनेही ही कर सवलत देण्यास नकार दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई महापालिकेने पालिका हद्दीतील 700 चौरस मीटर पेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास राज्य शासनानेही सहमती दर्शविली होती. याच धर्तीवर पुणे महापालिकेतही 700 चौरस मीटरपेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना सवलत मिळावी असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनकवडे आणि नगरसेविका संगिता ठोसर यांनी स्थायी समितीत दिला होता. स्थायी समितीने तो प्रस्ताव प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविला होता.

प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायानुसार, राज्य शासनाने या पूर्वीच महापालिकेची जकात आणि त्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) हे मुख्य उत्पन्नाचे स्रोत रद्द केलेले आहेत. अशा स्थितीत पुन्हा मिळकतकरात सवलत देणे हे सध्याच्या आर्थिक स्थितीत पूर्णत: विसंगत ठरते. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या राज्य शासनाकडून जीएसटीच्या मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून असून त्यानंतर सर्वांत मोठा उत्पन्नाचा एकमेव स्रोत हा मिळकतकर आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील 700 चौरस मीटरपेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना मिळकतकरात सवलत देणे संयुक्तिक होणार नाही, असे या अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले होते. शहरात 700 चौरस मीटर पेक्षा कमी आकाराच्या कर आकारणी असलेल्या 16 हजार 600 मिळकती आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)