पुणे रेल्वे स्थानकातून पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण

पुणे- पुणे रेल्वेस्थानकातून पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. रोजगारासाठी पुण्यात आलेल्या दांम्पत्य रेल्वे स्थानकासमीोल दर्ग्या जवळ थांबले असता सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री जयसिंग चव्हाण(5) असे मुलीचे नाव आहे. याप्रकरणी जयसिंग चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
जयसिंग हे कुटूंबासह पुणे शहरात रोजगारासाठी आले आहेत. ते दर्ग्यासमोर थांबले असताना त्यांची दोन्ही मुले तेथे खेळत होती. त्यांचे अचानक लक्ष गेल्यावर जयश्री तेथे आढळली नाही. यामुळे त्यांनी रेल्वे स्टेशन परिसर, एसटी स्थानक परिसर , ससूनचा परिसरात शोध घेतला. परंतू ती कोठेच सापडली नसल्याने पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. चव्हाण दांम्पत्य मजुरी करते. तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीव्दारे तपास करण्यात येत आहे. जयश्रीने हिरव्या रंगाचा कुर्ता व पिवळ्या रंगाची सलवार घातली होती. या संदर्भात कोणास माहिती असल्यास या 020 26129398 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)