पुणे – रेल्वे प्रशासनाच्या मेडिकल सेवेचा 350 जणांना फायदा

पुणे – रेल्वेने प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला औषधोपचाराची गरज भासल्यास त्याला रेल्वे प्रशासनाकडून अत्यावश्‍यक सेवा पुरविली जाते. चालु गाडीत प्रवासी आजारी पडल्यास तशी सूचना तिकीट निरीक्षकामार्फत प्रशानाला दिली जाते. यानंतर लगोलग पुढील स्थानकावर प्रशासनाकडून मेडिकल पथक उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात 350 लोकांना रेल्वे प्रशासनाच्या या सेवेचा फायदा झाला आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळून दिला जातो. प्रशासनाकडून प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर 24 तास अत्यावश्‍यक आरोग्य सेवा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आरोग्य सुविधेच्या मदतीसाठी प्रशासनाकडून एका विशेष बुथची स्थापना करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान एखादा प्रवाशाला त्रास जाणवू लागला तर त्याने तत्काळ गाडीतील तिकीट निरीक्षकाशी संपर्क साधावा. यानंतर तिकीट निरीक्षकामार्फत ही बाब पुढील स्थानकाला दिली जाते. त्यानुसार प्रवाशाला पुढील स्थानकावर उतरवून त्याच्यावर तत्काळ उपचार केले जातात. प्रवाशाला रेल्वे मेडिकलच्या सुविधा पुरविल्या जातात मात्र, प्रवाशाची जर कुठल्या दवाखान्यात जाण्याची इच्छा असेल तर त्याला इच्छितस्थळी पोहोचवले जात असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)