पुणे रेल्वे पोलिसांकडून दागिने चोरणारा जेरबंद

येरवडा – मुंबई-हैदराबाद रेल्वे गाडीतून पंधरा लाख रुपये किमंतीचे दागिने चोरी करणाऱ्याला पुणे रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी विनायक दिनकर जोशी (रा. शिवराज कॉलनी, रहाटणी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लक्ष्मण काळे (वय 40, रा. नवी मुबंई, मुळ रा. जामखेड,नगर) याला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपी हा इंद्रायणी एक्‍सप्रेसने मुंबई येथे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पुणे रेल्वे पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
रेल्वे पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, अप्पर पोलीस अधिक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम वहिले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव, सहाय्यक निरिक्षक हिम्मत माने-पाटील, पोलीस हवालदार भिमा हगवणे, नाईक सुनिल कदम, अमरदिप साळुंखे, पोलीस कर्मचारी अनिल जुंदणे, महिला पोलीस कर्मचारी बेबी थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)