पुणे – ‘रुसा’कडून 170 कोटींचा निधी मंजूर

पुणे – राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाची (रुसा) पंधरावी प्रोजेक्‍ट ऍप्रुव्हल बोर्ड (पीएबी) ची बैठक आज दिल्लीमध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील दोन समूह विद्यापीठांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. दोन समूह विद्यापीठांना प्रत्येकी 55 कोटींचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच स्वायत्त महाविद्यालयांनाही निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राला रुसाकडून 170 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

पहिल्या समूह विद्यापीठाच्या प्रस्तावामध्ये हैद्राबाद, सिंध सोसायटीच्या हसाराम रुझुमल कॉलेज ऑफ कॉमर्स ऍन्ड इकॉनॉमिक्‍स, किशनचंद चेलाराम कॉलेज आणि बॉम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेज या तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या समूह विद्यापीठांच्या प्रस्तावामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (लीड कॉलेज), धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा (संलग्न महाविद्यालय) आणि रयत शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (संलग्न महाविद्यालय) या तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

दरम्यान, रुसामार्फत टप्याटप्याने निधी देण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्यात आली आहे. त्या महाविद्यालयांना रुसा अंतर्गत मंजूर झालेला निधी हा अध्ययन व अध्यापन, संशोधन अभ्यासक्रम तयार करणे आणि पायाभूत सोयीसुविधा यासाठी विनियोग करता येईल. रुसाच्या या मंजूर निधीपैकी 60 टक्‍के हिस्सा हा रुसाचा असेल, तर 40 टक्‍के हिस्सा हा राज्य शासनाचा असेल.

स्वायत्त महाविद्यालयांना 5 कोटींचा निधी मंजूर
1) सर परशुरामभाऊ कॉलेज, 2) डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, 3) गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ऍण्ड कॉमर्स, 4) चांगू कना ठाकूर आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज, 5) हंसराज जीवनदास कॉलेज ऑफ एज्युकेशन, 6) तुलजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ऍण्ड कॉमर्स, 7) सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, 8) कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, 9) सर सीताराम ऍण्ड लेडी शांताबाई पाटकर कॉलेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)