पुणे- रायकर मळा येथे ऑडी, होंडासिटी पेटवली

पुणे- धायरीतील रायकर मळा येथे दोन अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरून येत सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडासीटी या दोन गाड्या पेटून दिल्या. ज्वलनशील पदार्थ टाकून गाड्या पेटून दिल्याने लागलेल्या आगीत दोन्हीही गाड्या भस्मसात झाल्या आहेत. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी हसन अब्दूल जमील शेख (34, रायकर नगर गल्ली नं 18) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हसन अब्दूल जमील शेख हे धायरी येथील रायकर नगर परिसरातील गल्ली नं 18 मधील उज्ज्वल टेरेस येथे राहण्यास आहेत. त्यांच्या इमारातीमध्ये एक ऑडी व होंडा सिटी कार अशी दोन वाहने पार्क केली होती. त्यावेळी पहाटे दोनच्या सुमारास या दोन्ही कारना आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्‍यात आणली. मात्र, तोवर दोन्ही वाहने जळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कोणीतरी अज्ञाताने ज्वलनशील पदार्थ टाकून ही दोन्ही वाहने पेटवून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटिव्हीफुटेज तपासले असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत. फायरमन संतोष भिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रायकर मळा येथील उज्ज्वल टेरेस या सोसायटीत गाड्यांना आग लागल्याचा कॉल मिळाला होता. घटनास्थळी दाखल होईपर्यंत ऑडी आणि होंडासिटी या गाड्या जळून खाक झाल्या होत्या; परंतु शेजारील तिसरी गाडी जळण्यापूर्वीच आग विझवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)