पुणे – रागाच्या भरात पत्नीसह तीघांवर कोयत्याने वार

पुणे – पार्लरमध्ये काम करणाऱ्या बायकोचा राग आल्याने नवरा – बायकोची भांडणे झाली. अशातच नवऱ्याची समजुत काढण्यासाठी बायको आपल्या मालकीनीसहीत एका साथीदाराला घेऊन नवरा काम करत असलेल्या ठिकाणी आली. मात्र, डोक्‍यात अगोदरच राग असल्याने त्याने बायकोसहीत इतर दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास टिळक रोडवरील क्षेत्रीय कार्यालयासमोर घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असुन वार करुन फरार झालेल्या आरोपीच्या शोधात खडक पोलीसांनी पथक रवाना केले आहे.

शांताराम निडूणी(25) असे कोयत्याने वार करणाऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात दत्तात्रय ढोमसे (42, रा. आंबेगाव खुर्द) यांच्या डाव्या हाताच्या पंजावर गंभीर वार झाला आहे. तर बायको मंजू नरकटे आणि सीमा शिंदे यांच्या हातावर व दंडावर वार झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, आरोपी आणि मंजु नरकटे हे दोघे पती – पत्नी आहेत. आरोपी हा टिळक रस्त्यावरील राहत स्पा पार्लरमध्ये कामास आहेत कर त्याची पत्नी ही नाशिकफाटा येथील एका ब्युटीपार्लरमध्ये कामाला आहे. सीमा शिंदे या ब्युटीपार्लरच्या मालकीन आहेत. आपली पत्नी काम करत असलेले ठिकाण आरोपीला आवडत नव्हते. यातुनच त्यांच्यात वाद झाले. गुरुवारी नवरा बायकोत झालेल्या भांडणात वाद टोकाला गेले. त्यामुळे आरोपीच्या डोक्‍यात बायकोविषयी प्रचंड राग होता. अशातच गुरुवारी सायंकाळी बायको तसेच ब्युटीपार्लरची मालकीन सीमा शिंदे व त्यांचा आणखी एक सहकारी दत्तात्रय ढोमसे असे तीघेजण मिळुन आरोपीची समजुत काढण्यासाठी त्याच्या स्पा पार्लरवर आले. मात्र, अगोदरच मनात राग असल्याने त्यांच्यात भांडणे झाली. ही भांडणे टोकाला जाऊन आरोपी शांताराम याने या तीघांवर कोयत्याने वार केले आणि तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधीक तपास खडक पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)