पुणे: राखी तयार करण्याचा कच्चा माल खाक

हडपसर उन्नतीनगर येथील घटना

पुणे – हडपसरमधील उन्नतीनगर येथील रहिवासी इमारतीमध्ये असलेल्या एका राखी तयार करण्याच्या कारखान्याला आग लागली. या ठिकाणी दोन फ्लॅटमध्ये मोठया प्रमाणात राख्या तयार करण्याचा चायनीज माल ठेवण्यात आला होता. अग्निशमन दलाने तातडीने यातील बहुतांश माल बाहेर काढून आग आटोक्‍यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. गाडीतळ येथील उन्नतीनगरमध्ये नंदकिशोर राठोड यांचा राखी तयार करण्याचा कारखाना आहे. राठोड यांच्या तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर दोन फ्लॅटमध्ये हे साहित्य ठेवण्यात आलेले होते. त्यातील एका फ्लॅटच्या आतील बाजूस अचानक आग लागली.

या घटनेची माहीती राठोड यांनी तातडीने अग्निशमन दलास दिली. त्यावेळी हडपसर, कोंढवा आणि मध्यवर्ती कार्यालय अशा तीन ठिकाणच्या गाड्या आणि एक पाण्याच्या टॅंकर घटनास्थळी रवाना झाले. यावेळी संपूर्ण रूममध्ये मोठया प्रमाणात राखीच्या साहित्याचे बॉक्‍स असल्याने आग भडकण्याची शक्‍यता होती. त्यामुळे दलाच्या कर्मचाऱ्यांनी आधी तातडीने हा माल बाजूला काढून अवघ्या 15 मिनीटात आग आटोक्‍यात आणली. त्यानंतर 20 मिनिटे कुलिंगचे काम सुरू होते. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. तांडेल तानाजी गायकवाड, चालक भोंगळे, फायरमन जाधव, नवले, दडस, अनिल गायकवाड, अवाळे, मंगेश चकणे, कोंडगेकर, फडतरे यांच्यासह कोंढवा आणि मध्यवर्ती कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)