पुणे- रस्त्यात अडवून नागरिकांना धमकावणाऱ्या एकाला अटक

पुणे- भररस्त्यात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पिस्टलाने धमकावणाऱ्या गुंडास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्टलासह दोन जीवंत पितळी राऊंड ताब्यात घेतले आहेत. दत्तवाडीतील बालशिवाजी चौक येथून गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुबेर जाफर शेख (23, रा. श्रीकृष्ण मित्रमंडळ शेजारी, दत्तवाडी) असे अटक गुंडाचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ हे आपल्या सहकार्यांसह हद्दीत पेट्रोलींग करत होते. यावेळी बालशिवाजी चौक परिसरात एक व्यक्ती हातात पिस्टल घेऊन रस्त्यावरील नागरिकांना धमकावत शिवीगाळ करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत शेख याला हत्यारासह ताब्यात घेतले.

शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून एक पिस्टल, मॅगझीनमध्ये असलेले दोन जीवंत पितळी राउंड हस्तगत केले. हि कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीरक्षक अनिल डफळ, पोलीस हवालदार तानाजी निकम, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, रोहन खैरे, सागर सूतकर, शिवाजी क्षीरसागर यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तानाजी निकम करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)