पुणे: रस्त्यांचा विस्तार, सक्षम वाहतुकीवर भर देणार

मावळते जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्‍त केला विश्‍वास
नदीसुधार प्रकल्प ठरणार मोठे आव्हान

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी सोडविणे, विकास आराखड्याप्रमाणे रस्त्यांचे विस्तारीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुणे आणि हैद्राबाद या शहरांना वास्तव्यास अनुकुल शहरे असा दर्जा मिळाला आहे. नागरी समस्या सोडवून शहरातील नागरिकांचे जीवनमान अधिकाधिक उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मावळते जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राव पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राव यांनी मागील चार वर्षांच्या केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी राव यांनी सांगितले की, चार वर्षाच्या कार्यकाळात खूप काही गोष्टी करू शकलो. महापालिका आणि पीएमआरडीए यांच्यात समन्वय ठेवून कामे केली.

महापालिकेत कामांचे प्राधान्य वेगवेगळे असते. तत्काळ आणि दैंनदिन प्रशासन असे दोन भाग असतात. आयुक्त म्हणून दैनंदिन प्रशासनावर भर दिला जाईल. शहराला अधिकाधिक राहण्यायोग्य करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्‍यकता असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोवर सक्षम होत नाही, तोवर शहराचा जीवनमान उंचावण्याचा आलेख (लिव्हेबिलिटी इंडेक्‍स) वाढवता येणार नाही. नदीसुधार प्रकल्प आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे, शहराची जमिनीखालील सांडपाण्याची वाहिनी जुनी झाली आहे, त्यामुळे हा देखील मोठा महत्त्वाचा विषय आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात आधारभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हेदेखील मोठे आव्हान आहे. समाविष्ट गावाच्या अपेक्षांनुसार दर्जेदार नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, असे अनेक विषय आयुक्त म्हणून प्राध्यान्याने हाती घेऊ, असेही राव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)