पुणे: रस्ते भूसंपादनासाठी 25 टक्के जादा मोबदला

पुणे – राज्य महामार्ग, मुख्य जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि गाव मार्ग यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येते. यात आता शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्र महामार्ग अधिनियमामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे रस्त्यांच्या कामांसाठी भूसंपादन करणे सुलभ होणार आहे.

राज्य शासनाकडून रस्त्यांच्या कामासाठी जमिनीचे संपादन करण्यात येते. महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम 19 ब नुसार शासनास भूसंपादनासाठी भरपाईची देय रक्कम ठरविता येते. भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना योग्य भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2018 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातील भूसंपादन विषयक तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे.
त्यानुसार खासगी क्षेत्रारील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने संपादित करता येते. थेट खरेदी करावयाच्या जमिनीच्या मोबदल्याचा दर ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी जमिनीची थेट खरेदी करताना जमिनीची निगडीत सर्व बाबी विचारात घेऊन मोबदल्याची परिगणना केली जाते. त्यानंतर या मोबदल्याच्या रकमेवर 25 टक्के वाढीव रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)