पुणे येथे उद्या विश्‍वकर्मा समाजाची राज्यस्तरीय बैठक

बावडा- सर्व महत्त्वाच्या कारणांसाठीच सर्वांच्या विचाराने सर्व समाजबांधवांसाठी समन्वय समिती स्थापन करण्यासाठी पुणे येथे रविवारी (दि. 9) राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बावडा (ता. इंदापूर) येथे विश्‍वकर्मा समाजातील पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांची नुकतीच भेट घेतली. यावेळी भविष्यात महाराष्ट्र राज्य विश्‍वकर्मा समाज समितीची रुपरेषा स्पष्ट करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, जंगली महाराज रोड, बालगंधर्व नाट्यगृहासमोर, शिवाजीनगर येथे सकाळी 8 वाजता बैठक आयोजित केली आहे. समाजातील विविध पदाधिकारी यांच्या विचारांचे एकत्रीकरण, यातून समाजपयोगी धोरण, शैक्षणिक, सामाजिक प्रगती, सबलीकरण, आर्थिक स्तर उंचावणे व समन्वय समितीने ठरविलेली उद्दिष्टे पूर्ण करणे, हा उद्देश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)