पुणे : म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’मध्ये टोलेजंग इमारती

टीडीआरसह 3.70 एफएसआय देण्याचा निर्णय

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) म्हाळुंगे येथे राबविण्यात येत असलेल्या टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये (टीपी स्कीम) जागा मालकांना टीडीआरसह 3.70 एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हाळुंगे “टीपी स्कीम’मध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहे.

पीएमआरडीएकडून प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्यात येत आहे. हा रिंगरोड नगररचना योजनेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाळुंगे येथे “टीपी स्कीम’ ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रारूप “पीएमआरडीए’कडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच या नगररचना योजनेची प्रारूप बांधकाम नियमावलीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये अडीच एफएसआय देण्याबरोबरच प्रीमिअम शुल्क आकारून एक एफएसआय आणि पहिल्यांदाच नगररचना योजनेमध्ये 20 टक्के टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पीएमआरडीएने प्रथमच नगररचना योजनांमध्ये टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 0.20 टक्केच टीडीआर वापरता येणार आहे. त्यामुळे मान्य एफएसआयपेक्षा 20 टक्के अधिकचे बांधकाम करता येणार आहे. याशिवाय जमिनीच्या रेडीरेकनरमधील दरानुसार शुल्क आकरून अतिरीक्त एक प्रीमिअम एफसआय वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे मान्य अडीच एफएसआय अधिक एक प्रीमिअम एफएसआय आणि 20 टक्के टीडीआर असा मिळून सुमारे 3.70 एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे.

एकूण 250 हेक्‍टरवर “टीपी स्कीम’
3.70 एफएसआय वापरण्यास परवानगी
टीडीआर आणि प्रीमिअम एफएसआय वापरण्यास परवानगी
टोलेजंग इमारती उभ्या राहणार
.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)