पुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर

पुणे – पुणे मेट्रोच्या कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. हे काम देण्यात आलेल्या टाटा-गुलेरमार्क या कंपनीने शुक्रवारी या कामाचा विस्तृत आराखडा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना सादर केला. यावेळी या कामाच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्परी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे यावेळी कंपनीकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

गुलेरमार्कचे प्रकल्प समन्वयक एम्रे कायटन आणि टाटा प्रकल्पाचे एचओडी शैबल रॉय व महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, भूमिगत मार्गाचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डॉ. हेमंत सोनावणे आणि जनरल कन्सल्टन्ट टीमचे प्रकल्प समन्वयक हुकूम सिंग चौधरी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे मेट्रोच्या मार्गिका क्रमांक 1 पीसीएमसी ते स्वारगेट 11.570 किमीपैकी एकूण 5.019 किमी मार्ग हा भूमिगत आहे. भूमिगत मार्गाचे काम हे दोन विभागांत करण्यात येणार असून नुकतेच कृषी महाविद्यालय ते फडके हौद या कामाची निविदा मंजूर करून टाटा व गुलेरमार्क या संयुक्त कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

असे होणार भूमीगत मेट्रोचे काम
या कामामध्ये टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहे. त्याबरोबरच पायरिंग रिग, ओव्हर हेड क्रेन, लोकोमोटिव्ह, हायड्रा इत्यादी मशीन वापरण्यात येणार आहेत. ही कंपनी लवकरच कास्टिंग यार्ड, ब्याचिंग प्लान्ट सुरू करणार असून या कामात 3,392 रिंग वापरण्यात येणार आहेत. या रिंगमुळे टनेलचा आकार एकसारखा ठेवण्यात येतो. या कामात जलद गतीने काम होण्यासाठी महामेट्रोने आधीच शाफ्टचे काम सुरू केले असून लवकरच ते पूर्ण होऊन टनेलच्या कामाला सुरवात होईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या बैठकीत देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)