पुणे: मुलीला डांबून ठेवणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे – मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला सात तास डांबून ठेवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असे कृत्य करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लक्ष्मण मरीबा भुरे (रा. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे मुळ रा. चाकुर ता. लातूर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 8 वी इयत्तेत शिकरणाऱ्या 16 वर्षीय पीडित मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ती मुलगी मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी भुरे याने तिला ओढून जबरदस्तीने घरात नेले. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य कराताना तिने विरोध केल्यानंतर भुरे याने तिचे हातपाय ओढणीने बांधले. तसेच तिचे तोंडही बांधले. त्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी भुरेच्या घराचा दरवाजा वाजविल्यानंतर भुरेने त्या मुलीला ओरडू नको, अशी धमकी दिली. परंतु, भुरे बद्दल संशय अधिक बळावल्याने दरवाजा उघडल्यानंतर भुरेने केलेला सर्व प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी त्याला अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)