पुणे-मुंबई महामार्गावर देहुरोड येथे तीन “सब वे’चा आराखडा प्रस्तावित

देहुरोड  (वार्ताहर) – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर देहुरोड येथील संत तुकाराम महाराज प्रवेशद्वारासमोर दोन आणि केंद्रीय विद्यालय येथे एक “सब वे’ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यासाठी लष्कराची जागा लागणार असून, देहूरोड स्थानिक लष्करी मुख्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय मुंबई येथे रस्ते विकास महामंडळाचे पदाधिकारी, लष्कर, कॅन्टोन्मेन्टचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने बैठकीत घेण्यात आला आहे. देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर देहूरोड पोलीस ठाणे चौकात उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर देहू, देहूरोड पालखी मार्गावरून देहूरोड येथील वीरस्थळासमोर महामार्ग ओलांडणे असुरक्षित, धोकादायक होणार असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग बांधण्याची मागणी होत होती. मावळचे आमदार बाळा भेगडे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी रस्त्याची पाहणी केली. या वेळी लष्करी मुख्यालयाकडून सब वे व सेवा रस्ता बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यास वैष्णव यांनी तत्त्वता मान्यता दिली होती. त्यानंतर आठवड्यात मुंबई येथे संयुक्‍त बैठक घेण्याचा निर्णय झाला होता.

मुंबई येथील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यलयात झालेल्या बैठकीत देहूरोड येथील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील प्रवेशद्वारासमोर बारा मीटर रुंदीचे दोन तसेच केंद्रीय विद्यालय येथे एक सब वे बांधण्याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. सब वे बांधण्यासाठी लष्कराच्या ताब्यातील जागा लागणार असल्याने त्याकरिता किती जागा लागेल याबाबतचा आराखडा लष्करी मुख्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सेंट्रल चौकात नियोजित उड्डाणपूल…
देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्ग व मुंबई बंगळुरू मार्गावर देहूरोड पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सेंट्रल चौकात (वाय जंक्‍शन) काळात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुंबई येथे झालेल्या बैठकीला मावळचे आमदार संजय भेगडे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, लष्करी मुख्यालयाचे प्रमुख ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य ललित बालघरे, भाजपचे शहराध्यक्ष कैलास पानसरे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)