पुणे-मुंबई महामार्गावर कारचालकाला लुटले

पिंपरी, (प्रतिनिधी) – कार थांबवुन चालकाला चाललेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्‍याने जबर मारहाण करुन लुटले. ही घटना बुधवारी रात्री साडे बारा वाजता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घडली. कार चालक राजेश वाघ (वय 34, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी भोसरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश वाघ हे बुधवारी (दि.21) रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या खासगी कार मधून जात असताना पाच ते सहा जणांच्या टोळक्‍याने त्यांना थांबवून “आमच्या कारला तुझी कार का घासली’ असे म्हणून त्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. यानंतर आरोपींनी राजेश यांच्याकडील मोबाईल, सोन्याची चेन व रोख े सात हजार पाचशे रुपये असा एकूण 82 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकाऊन चोरुन नेला. आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)