पुणे-मुंबई महामार्गावर अपघाग्रस्त टेम्पोतून पाणीचोरी

लोणावळा – टेम्पोचा अपघात झाल्याची माहिती मालकाला फोनवरून कळवित असताना गावकऱ्यांनी टेम्पोतून पडलेल्या 64 हजार 800 रुपयांच्या पाण्याच्या बाटल्या गायब केल्या. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला गावाजवळ 23 जून रोजी हा प्रकार घडला. याबाबत शुक्रवार (दि. 13) दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी समाधान दिलीप खंडागळे (वय 26, रा. यवईगाव, ता. भिवंडी, जि. पुणे. मूळ रा. महाळगी, ता. जि. उस्मानाबाद) यांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात पाणीचोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान पाण्याच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. त्याने 23 जून रोजी वडगाव मावळ येथून एका कंपनीमधून पाण्याचे बॉक्‍स भरले. वडगाव येथून भिवंडीला जात असताना कार्ला गावाजवळ तेजस हॉटेलसमोर टेम्पो आला असता, टेम्पोला अपघात झाला. या अपघाताबाबत समाधान आपल्या मालकाला फोनवर माहिती देत होता. मोबाईलला रेंज नसल्याने तो टेम्पोपासून काही अंतरावर जाऊन माहिती देत होता.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी टेम्पोतून 720 पाण्याच्या बाटल्यांचे एकूण 64 हजार 800 रुपये किमतीचे बॉक्‍स चोरून नेले. यावरून तक्रार देण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)