पुणे-मुंबई द्रुतगतीवर अपघातात पिता-पुत्रांचा मृत्यू

रस्त्यावरील उभ्या डंपरवर मोटार आदळली; चार जखमी

कामशेत – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून द्रुतगती मार्गावर उभ्या असणाऱ्या डंपरला (ट्रक) पाठीमागून मोटारीची जोरात धडक बसली. या अपघातात पिता-पुत्रांचा मृत्यू झाला तर सात गंभीर जखमी झाले आहेत. पिंपळोली गावच्या हद्दीतील सोमवारी (दि. 3) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

-Ads-

इस्माईल उमर शेख (वय 74), जावेद इस्माईल शेख (वय 40) असे अपघातात मृत्युमखी पडलेले दोघे पिता-पुत्र आहेत. तर अख्तरी जावेद शेख, इन्सिरा जावेद शेख (वय 6), सामिया जावेद शेख (वय 4), सुलेमान अब्दल सत्तार शेख (वय 45), मसूद अब्दुल सत्तार शेख (वय 38, सर्व राहणार एल.आय.जी कॉलनी, विनोबा भावे नगर, कुर्ला वेस्ट, मुंबई), मोटार चालक विलास संभाजी डफळ (वय 35, रा. साविंदणे, शिरूर) असे सहा जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 2) जावेद शेख याची आजी आलीमा बी आदम निशानदार हिच्या अंतविधीसाठी कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे चालक विलास डफळ याची मोटार भाड्याने घेऊन गेले होते. तेथील अंतविधी सायंकाळी अटोपून ते मुंबईला परतत असताना सोमवारी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास पिंपळोली गावच्या हद्दीतील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उभ्या असणाऱ्या डंपरला (एम. एच. 16 ए.वाय. 8969) पाठीमागून जोरात धडकल्याने अपघात झाला. या अपघातात इस्माईल उमर शेख आणि जावेद इस्माईल शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील गंभीर जखमींना त्यांच्यावर निगडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.

द्रुतगती मार्गावर नियम डावलून अनेक अवजड वाहने थांबत आहेत. अशा वाहनांना वेगात येणारी वाहने धडकून वारंवार अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहेत. यामुळे द्रुतगती मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठेवलेली “डेल्टा फोर्स’ ही यंत्रणा निरपयोगी ठरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)