पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वे गुरुवारी एक तासासाठी बंद

Mumbai Pune e way

कामशेत – पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वे वर गुरुवारी (दि. 6) “ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यावेळी मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक्‍स्प्रेस-वेची मार्गिका एक तासासाठी बंद असणार आहे. एक्‍स्प्रेस-वे वर सूचना फलक लावण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी 12 ते 1 दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. हा ब्लॉक फक्‍त गुरुवारीच घेण्यात येणार असल्याची माहिती “एमएसआरडीसी’कडून प्राप्त झाली आहे.

दरम्यान पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर कोणताही “ब्लॉक’ नसणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, ही वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत असणार आहे.

“ब्लॉक’ सुरु असताना एक्‍स्प्रेस-वे वरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाणार आहे. गुरुवारी केवळ पुणे-मुंबई मार्गावर “ब्लॉक’ घेण्यात येत असून, गणपतीनंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच “ब्लॉक’ घेऊन सूचना फलक लावले जाणार आहेत. एक्‍स्प्रेस-वे वर बोरघाटात अथवा कुठेही वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांजवळ प्रवाशांसाठी सूचनांसह अनेक फलक लावण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)