पुणे मार्केटयार्डात कर्नाटक हापूस दाखल

15 दिवस आधीच आवक:डझनास 700 ते 800 रु. भाव

पुणे – मार्केटयार्डातील फळविभागात मागील दोन दिवसांपासून कर्नाटक हापूसची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच आवक सुरू झाली असून, हुबळी, धारवाड आणि शिकारीपूर भागातून ही आवक होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घाऊक बाजरात हापूसच्या डझनाला 700 ते 800 रुपये किलो भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरूवातीला हापूसला मिळालेले भाव स्थिर असल्याचे कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.

येथील फळबाजारात कर्नाटक हापूसबरोबर कर्नाटकातील बदाम, सुंदरी, लालबाग या जातीच्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत बाजारात कर्नाटक हापूसची 20 डझन, बदामची 350 ते 400 किलो आणि सुंदरीची 150 किलो आणि लालबागची 100 किलो अशी आवक झाली. याविषयी उरसळ म्हणाले, कर्नाटक हापूसचा हंगाम एप्रिलमध्ये सुरू होतो. तोपर्यंत आता तुरळक आवक होणार आहे. कर्नाटकात यंदा आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आंब्याचे उत्पादन चांगले होणार आहे. थंडी कमी होताच आवक वाढेल.

कर्नाटकी आंब्यांचे भाव
कर्नाटक हापूस एक डझन-700 ते 800 रु.
सुंदरी-50 रुपये किलो
बदाम-70 ते 80 रु. किलो
लालबाग-60 ते 80 रु. किलो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)