पुणे : मारहाण करणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

पुणे- मित्रांसोबत गप्पा मारत उभा असताना अचानक जवळ येत चौघांनी मिळुन दोन तरुणांना विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, चाकुने वार देखील केले. मारहाण करणाऱ्या या चौघांना खडक पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी यांनी असे आदेश दिले आहेत.

सादीक अन्वर शेख (38, रा. लोहीया नगर), वाजीद अन्वर शेख (27, रा. लोहीयानगर), अल्लाउद्दीन महंमद खाजा शेख (41, नाना पेठ), अरीफ अब्दुल रहमान शेख (25, रा. नाना पेठ) असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नदीम शेरखान ईनामदार (23, रा. गणेशपेठ, नाडे गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास डावरे चौक, भवानी पेठ, स्वामी समर्थ मठाजवळील सार्वजनिक रोडवर घडली.

फिर्यादी हे त्यांच्या मित्र हैदरअली महंमद पठाण (52, रा. गणेशपेठ) यांच्यासह इतर मित्रांसोबत सदर ठिकाणी गप्पा मारत उभे होते. यावेळी अचानक जवळ येत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केली. यातील आरोपी वाजीद शेख याने त्याच्याकडील लोखंडी चाकुने फिर्यादींचा मित्र हैदरअली याच्यावर चाकुने वार केले. तर, फिर्यादीसहीत इतरांना दगडाने तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकु हस्तगत करायचा आहे. तसेच, मारहाण का केली यासंदर्भात सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)