पुणे: मान्सून 28 मेपर्यंत केरळात – आयएमडी

पुणे – मोसमी वाऱ्यांच्या वहनामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे साधारणत: 28 मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, अशी शक्‍यता आहे. यावर आता हवामान खात्यानेदेखील शिक्‍कामोर्तब केले आहे.

मान्सून केरळात लवकर दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने दोन दिवसांपूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार बुधवारी हवामान खात्यानेही मान्सून केरळात नेहमीपेक्षा लवकर दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, अंदमान-निकोबार बेटावर साधारणत: 20 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. त्यानंतर 1 जूनपर्यंत मान्सून केरळात येतो. पण यंदा अंदमानात मान्सून एक ते दोन दिवस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्याचा केरळातील आगमनावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. सध्या नागरिक हे उकाड्याने त्रस्त आहेत. त्यामुळे मान्सूनचे आगमन कधी होते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मान्सून आता लवकर दाखल होणार असल्याने थोडे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)