पुणे: महिलेने घेतला महिला पोलिसाच्या हाताचा चावा

सिग्नल मोडल्यानंतर अडविल्याने केले कृत्य

पुणे – सिग्नल तोडून धुम ठोकणाऱ्या महिलेने महिला पोलिसाच्या हाताचा चावा घेतल्याची घटना लष्कर परिसरात घडली. याप्रकरणी महिला पोलिसाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित महिलेवर दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेखा साबळे या लष्कर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार वानवडीतील एका तीस वर्षीय महिलेविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सायंकाळी त्यांच्या सहकाऱ्यांसह लष्कर परिसरातील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत उभ्या होत्या. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपी महिला सिग्नल तोडून निघून जात असताना साबळे यांनी तिला थांबविले. तिच्याकडे चौकशी करीत असताना दुचाकीस्वार महिलेने फिर्यादींना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादींच्या सहकारी या मदतीसाठी मध्ये पडल्या असता तिच्या हाताचा चावा घेत जखमी केले. शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. पी. खेडकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)