पुणे : महिनाभरात दाखल होणार 33 नव्या मिडीबस

पुणे – राज्यातील काही प्रमुख शहरात खास महिलांसाठी तेजस्विनी मिडी बस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याअंतर्गत शहराला देखील 200 बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. यात भर म्हणून येत्या महिन्याभरात महिलांसाठी आणखी 33 नव्या मिडीबस दाखल होणार आहेत.

जागतिक महिलादिनी खास महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी राज्य सरकारने तेजस्विनी या बसची सुरवात केली. त्यानुसार शहरातदेखील ही योजना राबवण्यात आली. राज्य शासनाच्यावतीने पीएमपी प्रशासनाकडे यासाठी 10 कोटी रुपये मिळाले होते. त्यानूसार निविदा मागविण्यात आल्या होत्या. यातून 33 बसच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून संचालक मंडळाच्या बैठकीत या निविदांना मंजुरी मिळाल्यावर नव्या बस पीएमपीकडे दाखल होतील.

सध्या शहरात 200 मिडीबस कार्यरत आहेत. या नव्याने येणाऱ्या 33 नव्या मिडीबसचा समावेश झाल्यास या बसची एकुण संख्या 233 होणार आहे. यानंतर शहर व पिंपरी-चिंचवडमधील गर्दीच्या मार्गावर महिलांसाठी या बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही शहरातील मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ही बस सुरू करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)