पुणे: महा ई-सेवा केंद्राच्या चालकास अटक

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण : कागदपत्रांमध्ये फेरफार करता येणारे सॉफ्टवेअर आढळले

पुणे – बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी एका महा ई-सेवा केंद्राच्या चालकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करता येईल असे सॉफ्टवेअर आढळले आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मे. स्तुती एन्टरप्रायजेसचे चालक ऋषीकेश गुलाब खिलारे (25, रा.वारजे) असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विकी परदेशी हे उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम करतात. त्यांच्याकडे 24 एप्रिल 2018 रोजी आलेल्या चौकशीपत्राच्या अनुषंगाने जातीचा दाखला पडताळणीसाठी आला होता. या दाखल्याची पडताळणी केल्यावर तो ऑफलाईन पध्दतीने मिळवला असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या कार्यालयाकडून मात्र 1 मार्च 2018 पासून दाखल ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतो. यामुळे बनावत जात प्रमाणपत्र दाखल मिळत असल्याचा संशय बळावला. यामुळे त्यांनी कार्यालयाती सहकाऱ्यांची महा ई-सेवा केंद्राची तपासणी करण्यासाठी नियुक्ती केली. दरम्यान जनवाडी येथील मौजे भांबुडे येथील मे. स्तुती एन्टरप्रायजेस येथे चौकशी केली असता त्यांच्याकडे दिलेल्या दाखल्यांचे कोणतेही रेकॉर्ड आढळून आले नाही. यासाठीचे रजिस्टरही त्यांच्याकडे नव्हते. त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता चालक खिलारे याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडील संगणकाची तपासणी केली असता अनेक संशयास्पद कागदपत्रे व बनावट दाखले तयार केलेले आढळले. तसेच या संगणकावर शासकीय कागदपत्रे बदलता येऊ शकतील असे सॉफ्टवेअरही आढळून आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आर. जी. खोमणे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)