पुणे: महावितरणकडून ठेकेदारांचे पेमेंट थांबविण्याचे आदेश

Electricity

वीजबिल वाटप आणि वीज रिडिंगमध्ये एजन्सीचा घोळ उघड

पुणे – वीजमीटरचे रिडिंग घेण्यात आणि वीजबिलांचे वाटप करण्यात बहुतांशी एजन्सीज घोळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा जबरदस्त फटका महावितरण प्रशासनाला बसला असून ग्राहकांनाही त्याची किंमत मोजावी लागत आहे. त्याची महावितरण प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या एजन्सीच्या कामाचा लेखाजोखा प्रशासनाने मागविला असून या ठेकेदारांचे पेमेंट थांबविण्याचे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामाचा विस्तार आणि त्या तुलनेत असलेली कामगारांची संख्या यांचा ताळमेळ बसविण्यासाठी महावितरण प्रशासनाने काही कामे खासगी ठेकेदारांना दिली आहेत. त्यापोटी या ठेकेदारांना कमिशन देण्यात येते. त्याच पद्धत्तीने सर्व प्रकारच्या ग्राहकांचे वीजमीटरचे रिडिंग घेणे आणि वीजबीलांचे वाटप करणे ही कामेही ठेका पद्धत्तीने देण्यात आली आहेत. मात्र; गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत वीजमीटरचे रिडिंग घेणे आणि वीजबीलांचे वाटप वेळेत न होण्याच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचा परिणाम प्रशासनाच्या महसूलावर होत आहे. वेळेच्या आधी महसूल मिळत नसल्याने ग्राहकांनाही बीले भरणे शक्‍य होत नसल्याने त्यांना नाहक दंड भरावा लागत आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी यापूर्वी महावितरण प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.

त्यानुसार परिमंडलाच्या अखत्यारीतील सर्व ठेकेदारांच्या कामाचा लेखाजोखा मागविण्यात आला होता. त्याशिवाय विभागनिहाय अधिकाऱ्यांकडेही सर्व ठेकेदारांच्या कामाची माहिती मागविण्यात आली होती. त्याबाबतचा अभ्यास केल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर काही ठेकेदारांची कामेच समाधानकारक नसल्याची माहिती प्रशासनाकडे मागितली होती. त्यानुसार या ठेकेदारांचे पेमेंट थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून गरज पडल्यास त्यांचा ठेकाही काढून घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)