पुणे – महामंडळाची कुमक वाढणार

वाहक, चालकांच्या सहाशे जागांवर सरळेसेवा भरती प्रक्रिया सुरू

पुणे – प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहक आणि चालकांच्या सहाशे जागा सरळसेवा भरतीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात आर्थिक दुर्बल घटकांसाठी दहा टक्‍के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया बुधवारपासून (दि. 6) सुरू होणार आहे. या दोन्ही पदांचे अर्ज ऑनलाइन मागविण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एसटी महामंडळाने खासगी बसचालकांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आपल्या ताफ्यात शिवनेरी, शिवशाही, अश्‍वमेध अशा वातानुकुलित आणि आरामदायी बसेस दाखल केल्या आहेत. त्याशिवाय महत्त्वाच्या काही मार्गांवर “स्लिपर कोच’ सेवाही देण्यात येत आहे. तसेच अन्य बसेसची संख्याही वाढविण्यात आली असून नव्याने बाराशे बसेस मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळेच प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सुरळीत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेऊनच गेल्या महिन्याच्या सुरुवातीला वाहक आणि चालकांच्या 4 हजार 116 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर कुमक कमी पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊनच नव्याने आणखी सहाशे चालक आणि वाहकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक तरुणांनी महामंडळाच्या msrtc.in अथवा msrtcexam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक माधवराव काळे यांनी “प्रभात’ शी बोलताना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)