पुणे महापौर चषक सॉफ्टबॉल स्पर्धा: पुणे शहर संघाचा मुंबईवर सहज विजय

पुणे: पुणे शहर, कोल्हापुर, सांगली, पिंपरी चिंचवड संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या महपौर चषक सॉफ्टबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात विजयी आगेकूच नोंदवली.

सकाळच्या सत्रात मुलींच्या सामन्यात पुणे शहर विरुद्ध मुंबई सामन्यात 8-3 फरकाने मुली पुणे शहर संघ विजयी झाला. यामध्ये मोहिनी व हर्षदा प्रत्येकी 2, तर संजीवनी, माधुरी, मोनाली, प्रतिक्षाने प्रत्येकी 1 होमरन मारला तर मुंबई संघातील निकीता, भूमी, अक्षदा हिने प्रत्येकी 1 होमरन मारुन संघास टक्कर देण्याचा चांगलाच प्रयत्न केला.
तर मुलींच्या गटातील अन्य सामन्यात पुणे जिल्हा विरूद्ध अहमदनगर सामन्यात पुणे जिल्हा संघ 5-0 होमरनच्या फरकानी विजयी झाला. विजयी संघातील आईशो 2, फराना, पूर्वा, अलप्दा हिने प्रत्येकी 1 होमरन केला. यावेळी पुणे जिल्हा संघाने खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, पिंपरी चिंचवड विरूद्ध इंदापूर(मुली) सामन्यात 13-10 फरकाने पिंपरी चिंचवड संघ विजयी झाला. यामध्ये पिंपरी चिंचवडच्या रूपाली, पार्वती प्रत्येकी 3, स्मिता,वैष्णवी स्मिता प्रत्येकी 2, रीतू, कीर्ती, ऋतूजा यांनी प्रत्येकी 1 होमरन केला तर उपविजेतेपद इंदापूर संघातील अनुराधा, साक्षी, संजीवनी हिने प्रत्येकी 2, वैष्णवी, निशा, सिद्धी, रोहिणी हिने प्रत्येकी 1 होमरन केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)