पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; घोरपडी यंग वन्सचा आयफावर विजय

पुणे – घोरपडी यंग वन्स संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत आयफा स्काय हॉक्‍स संघाचा टायब्रेकरमध्ये पराभव करताना पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेली ही स्पर्धा ढोबरवाडी येथील मैदानावर सुरू आहे. अन्य सामन्यांत स्निग्मे, रियल पुणे युनायटेड आणि सिटी क्‍लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना विजयी सलामी दिली.

अखेरपर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात घोरपडी यंग वन्स संघाने आयफा स्काय हॉक्‍स संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. निर्धारित वेळेअखेर 1-1 अशी बरोबरी होती. निर्धारित वेळेत घोरपडीकडून विशाल अंगिरवालने तर आयफा स्काय हॉक्‍सकडून वासिवडेकरने गोल केले. तर टायब्रेकरमध्ये घोरपडीकडून विशाल अंगिरवाल व ऋतुराज पाटील यांनी लक्ष्य वेध केला. मात्र स्काय हॉक्‍सकडून केवळ जी. हाकिसलाच गोल करता आला.

आणखी एका लढतीत स्निग्मे संघाने स्ट्रायकर्स एफसीचा 1-0 असा पराभव केला. स्निग्मेच्या सुमित भंडारीने 10व्या मिनिटाला एकमेव विजयी गोल केला. तिसऱ्या सामन्यात सिटी क्‍लबने पिफा संघावर 2-1 अशी मात केली. सिटी क्‍लबकडून निर्मल छेत्रीने 28व्या व 39व्या मिनिटाला गो करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर पिफा संघाकडून अक्षय यादवने 35व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

एकतर्फी झालेल्या चौथ्या सामन्यात रियल पुणे युनायटेड संघाने युनिक वानवडी संघाचा 5-1 अशा फरकाने दणदणीत पराभव केला. रियल पुणे युनायटेडकडून स्वप्निलने 4 गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत युनिक वानवडी संघाकडून अक्षयने एकमेव गोल करीत दिलेली झुंज एकाकी ठरली.

सविस्तर निकाल-

घोरपडी यंग वन्स वि.वि. आयफा स्काय हॉक्‍स संघ (टायब्रेकरमध्ये) 3-2,
स्निग्मे एफसी वि.वि. स्ट्रायकर्स एफसी 1-0,
सिटी क्‍लब वि.वि. पिफा संघ 2-1,
रियल पुणे युनायटेड संघ वि.वि. युनिक वानवडी संघ 5-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)