पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; स्निगमे आणि रियल पुणे संघांची विजयी आगेकूच

पुणे – अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यांमध्ये स्निगमे फुटबॉल क्‍लब आणि रियल पुणे युनायटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर संघर्षपूर्ण मात करताना पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आगेकूच केली.

पुणे महानगर पालिकेने आयोजित केलेली ही स्पर्धा ढोबरवाडी येथील मैदानावर होत सुरू आहे. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या दिवशी एकूण दोन सामने झाले. यातील पहिल्या सामन्यात स्निगमे फुटबॉल क्‍लबच्या संघाने जी.वाय.ओ संघावर 8-7 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमणाला प्रारंभ केला होता. त्यामुळे दोन्ही संघांनी मिळून या सामन्यात तब्बल 15 गोल नोंदवले. सामन्याच्या 16व्या मिनिटालाच पहिला गोल नोंदवत स्निगमेने आपले खाते उघडले. मात्र दहा मिनिटांनी जी.वाय.ओ संघाने गोल करत बरोबरी केली.

जी.वाय.ओ संघाने सामन्याच्या 41व्या मिनिटाला गोल करत गोल करताना 2-1 अशी आघाडी घेतली. जी.वाय.ओ. संघाची आघाडी तोडताना स्निगमेच्या विक्रांत वाल्मिकीने गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लावावा लागला. टायब्रेकरमध्येही 6-6 अशी बरोबरी झाल्यानंतर स्निग्मेच्या जी. अजयने लक्ष्यवेध केला. मात्र जीवायओच्या श्रीधरचा नेम चुकला आणि स्निग्मेच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
तर दुसऱ्या सामन्यात रियल पुणे युनायटेड या संघाने सिटी क्‍लब या संघावर पेनल्टी शूटआऊट मध्ये 5-4 ने विजय मिळवला. सामन्यात रियल पुणे युनायटेडच्या यश भंडारेने 22व्या मिनिटालाच गोल करत रियल पुणेला आघाडी मिळवून दिली.

यानंतर संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या बचावफळीने चेंडू जास्तीत जास्तवेळा आपल्या गोलपोस्टपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही संघांना यश देखील मिळाले. परंतु सामन्याच्या 63व्या मिनिटाला सिटी क्‍लबच्या निर्मल छेत्रीने गोल करताना आपल्या संघाला 1-1 असे बरोबरीत आणले. त्यानंतर अतिरिक्‍त वेळेतही कोणालाच गोल करता न आल्याने पेनल्टी शूट-आऊटमध्ये निर्णय घेण्यात आला. पेनल्टी शूट-आऊटमध्ये रियल पुणे युनायटेडने पाच गोल नोंदवले तर सिटी क्‍लबला चारच गोल करता आले.

सविस्तर निकाल – स्निगमे फुटबॉल क्‍लब वि.वि. जी.वाय.ओ. 8-7, रियल पुणे युनायटेड वि.वि सिटी क्‍लब 5-4.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)