पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; उत्कर्ष, वानवडी, के.पी. इलेव्हन यांची आगेकूच

पुणे – उत्कर्ष क्रीडा मंडळ, वानवडी स्पोर्टस क्‍लब आणि के.पी. इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आगेकूच केली. पुणे महानगर पालिकेने आयोजित केलेली ही स्पर्धा ढोबरवाडी येथील मैदानावर सुरू आहे.

दुसऱ्या दिवशीच्या खेळात एकूण तीन सामने झाले. यातील पहिल्या सामन्यात वानवडी स्पोर्टस क्‍लब संघाने केएनपीएल संघावर 4-0 असा एकतर्फी विजय मिळवला. सामन्यात सुरुवातीपासूनच वानवडी स्पोर्टस क्‍लबने आक्रमक धोरण अवलंबले. केएनपीएलच्या बचाव फळीने चेंडू जास्तीत जास्त वेळा आपल्या गोलपोस्टपासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते.

परंतु सामन्याच्या 49व्या मिनिटाला योगेश घोडकेने शानदार गोल करताना वानवडी स्पोर्टस क्‍लबचे खाते उघडले. त्यानंतर योगेशने गोलची हॅटट्रिक नोंदवताना अनुक्रमे 49, 52 आणि 55 व्या मिनिटाला गोल नोंदवत चमकदार कामगिरी केली. तर प्रसाद वावडेने सामन्याच्या 58व्या मिनिटाला गोल करत वानवडी स्पोर्टस क्‍लबला 4-0 ने विजय मिळवून दिला.
तर दुसऱ्या सामन्यात के.पी. इलेव्हन या संघाने टायगर कंबाइन या संघावर 2-0 ने विजय मिळवला. आल्फ्रेड नेगलने लागोपाठ दोन गोल करताना के.पी. इलेव्हनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यात टायगर कंबाइन संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना पहिल्या सामन्याप्रमाणे संपूर्ण एकतर्फीच झाला.

तिसऱ्या सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंडळाने चेतक स्पोर्टस क्‍लब संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. अभिषेक पाटीलने दोन तर बूुस लुइसने एक गोल करताना उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अभिषेक पाटीलने सामन्यातील पहिला गोल 45व्या मिनीटाला केला. तोपर्यंत दोन्ही संघांना लक्ष्यवेध करण्यात अपयश आले होते. त्यानंतर ब्रूस लुईसने 50व्या आणि अभिषेक पाटीलने 60व्या मिनिटाला गोल करत उत्कर्षला 3-0 असा विजय मिळवून दिला.

सविस्तर निकाल – वानवडी स्पोर्टस क्‍लब वि.वि. के.एन.पी.एल 4-0, के.पी. इलेव्हन वि.वि. टायगर कंबाइन 2-0, उत्कर्ष क्रीडा मंडळ वि.वि. चेतक स्पोर्टस क्‍लब 3-0


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)