पुणे : महापौरपदाचे दावेदार विषय समित्यांमधून बाहेर

माधुरी सहस्त्रबुद्धे यांना विधि समितीचे सदस्यपद

पुणे- महापौरपदाच्या दावेदार असलेल्या भाजपमधील नगरसेविकांना विषय समित्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापौरपदासाठीची त्यांची दावेदारी कायम राहिली आहे. यात नगरसेविका वर्षा तापकीर, स्मिता वस्ते, माधवी देशपांडे, रेश्‍मा भोसले यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडून सव्वा वर्षानंतर महापौरपद बदलण्यात आल्यास या नगरसेविकांची दावेदारी कायम राणार आहेत.

मागील वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर अस्तित्त्वात आलेल्या सभागृहाची मुदत 2021 पर्यंत असेल. या पाच वर्षांत महापौर पदाचे आरक्षण पहिल्या अडीच वर्षांसाठी खुल्या गटातील महिलेसाठी आहे. त्यामुळे या अडीच वर्षांसाठी भाजपकडून 2 सदस्यांना महापौरपदाची संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. तूर्तास महापौर मुक्ता टिळक याचा 1 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर भाजपकडून सव्वा-सव्वा वर्षे महापौरपद दिले जाण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळेच या सदस्यांना विषय समित्यांच्या बाहेर ठेवल्याची चर्चा आहे.

हे सदस्य दोन ते तीन टर्म नगरसेविका असल्या, तरी त्यांना समिती दिलेल्या नाहीत. त्यामुळे महापौरपदासाठी त्याच्यामध्ये चुरस असेल. तर नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांचीही महापौरपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, त्याची निवड विधि समितीसाठी करण्यात आली असून त्यांना अध्यक्षपद दिले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्या महापौरपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडल्या आहेत.

पदे असणाऱ्यांना संधी नाही
भाजममधील वरिष्ठांकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार, ज्या सदस्यांना समिती अध्यक्षपदे अथवा स्थायी समिती सदस्यपदाची संधी देण्यात आली आहे, त्यांना महापौरपदी संधी दिली जाण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे ज्यांना विषय समित्यांमध्ये अथवा स्थायी समितीमध्ये संधी दिली आहे, ते महापौरपदाच्या शर्यती मधून बाहेर पडण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)