पुणे: महापालिकेला “हुडको’ संस्थेचा पुरस्कार

स्मार्ट लायटिंग, अर्बन स्ट्रीटसाठी मिळाला सन्मान

पुणे – पुणे महापालिकेच्या प्रकल्पाच्या माध्यमातून राहणीमानाचा दर्जा सुधारल्यामुळे सन 2017-18 यावर्षासाठी “हुडको’ या संस्थेकडून पुरस्कार देण्यात आला आहे. शहरातील स्मार्ट लायटिंग आणि जंगली महाराज रस्त्यावरील अर्बन स्ट्रीटसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

“हुडको’ ही शासनमान्य संस्था आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारीतील ही संस्था असून शहारांमध्ये परवडणारी घरे निर्माण करणे शहरांमध्ये विविध विकास प्रकल्प करण्याचे यासंस्थेकडून करण्यात येते. “हुडको’ पुरस्कारासाठी पुणे महापालिकेने पत्र पाठवून प्रकल्पाची माहिती दिली होती. “हुडको’ चे अधिकारी डॉ. रवीकांत यांनी बुधवारी महापालिकेला पत्र पाठवू पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली. येत्या 25 एप्रिलला पुरस्कार वितरण समारंभ होणार असून, यासाठी महापालिका आयुक्त आणि अधिकारी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलावले आहे.

पुणे शहरामध्ये “स्मार्ट स्ट्रिट लायटिंग’ हा प्रकल्प पीपीपी तत्वावर करण्यात आला आहे. याअंतर्गत शहरातील 77 हजार 800 एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. यामध्ये शहरामध्ये वीज बचत होणार असून वीलबिलामध्ये मोठी कपात झालेली आहे. एखाद्या ठिकाणी पथदिवा बंद असल्यास त्याची माहिती मोबाईलवरुन कळवल्यास तत्काळ दुरुस्ती होवू शकते, अशी सोय करण्यात आली आहे.

अर्बन स्ट्रीट गाईडलाईन प्रमाणे शहरातील जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. या आधीही या रस्त्याला पुरस्कार मिळाले आहेत. सायकल ट्रॅक, बगिचा, बसण्याची जागा तसेच पादचाऱ्यांचा विचार हा रस्ता तयार करताना करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)