पुणे: महापालिकेतील कागदी ‘लाल गठ्ठा’ होणार हद्दपार

जीईएम पोर्टलवरून केली खरेदी
या रेकॉर्ड रूमसाठी आवश्‍यक असलेली कपाटे तसेच मल्टिस्टोरेज साहित्य महापालिकेने केंद्रशासनाच्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस (जीईएम) पोर्टलवरून खरेदी केले आहे. त्यासाठी सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित असून या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यानुसार, या कामासाठी महापालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात वेगवेगळ्या विभागांच्या रेकॉर्ड जतनासाठी ठेवलेल्या तरतुदीमधून दिला जाणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

नायडू रुग्णालय आवारात अत्याधुनिक स्टोरेज रूम उभारणार

पुणे – महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाची कागदपत्रे तसेच नकाशे आणि इतर महत्वाच्या कागदपत्रांचे जतन करण्यासठी महापालिकेकडून अत्याधुनिक स्टोरेज सेंटर उभारले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू रूग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या तीन मजली इमरतीमध्ये हे फाईल मुव्हेबल स्टोरेज सेंटर असणार आहे. या संपूण सेंटरचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याने पुढे अनेक वर्षे ती महापालिकेस सुरक्षित ठेवता येणार आहे.

स्थापनेपासूनची जुनी कागदपत्रे महापालिकेकडून संकलित करण्यात येतात. त्यात जुने ठराव, फाईल, नकाशे, जन्म-मृत्यू दाखल्याच्या नोंदी पासून पालिकेच्या प्रत्येक फाईल आणि आवक जावक झालेल्या कागदांचा समावेश आहे. हे रेकॉर्ड सुरूवातीला काही वर्षे महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये लाल गठ्ठ्यांमध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे रेकॉर्ड महापालिकेच्या नानावाडा येथील रेकॉर्ड रूम मध्ये ठेवले जाते. मात्र, महापालिकेच्या कामाची व्याप्ती वाढतच असल्याने हे रेकॉर्ड रूम पालिकेस कमी पडत आहे. परिणामी, आता नवीन रेकॉर्ड उभारण्यात येत आहे. त्यासाठी डॉ. नायडू रुग्णालय आवारात असलेल्या एका नवीन तीन मजली इमारतीचे तब्बल 19 हॉल वापरले जाणार आहेत. या हॉलमध्ये सहजरित्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाता येतील, अशा प्रकारचे फाईल साठवण्याचे स्टोरेज यंत्रणा बसविली जाणार असून या पुढे त्या ठिकाणी रेकॉर्ड संकलन केले जाणार आहे. हे सर्व रेकॉर्ड अत्याधुनिक यंत्रणेद्वारे ठेवले जाणार असल्याने त्याचे जतन होण्याबरोबरच गरजेच्या वेळी ते तातडीने उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)